नवी दिल्ली : राष्ट्रपतीपद निवडणूकीचं काऊंटडाऊन सुरु झालंय. राष्ट्रपतीपद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठीचा सिलसिला सुरु झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप नेते व्यंकय्या नायडू यांनी लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांची भेट घेतली. यावेळी दोघांनी राष्ट्रपतीपद निवडणुकीबाबत चर्चा केलीय. 


दुसरीकडे अरुण जेटली यांनी तृणमूल काँग्रेस आणि बिजू जनता दल पक्षाच्या नेत्यांशी या निवडणुकीबाबत चर्चा केली. यानंतर व्यंकय्या नायडू यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांशी झालेल्या बैठकीचा तपशील पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना सादर केला.