आज होणार देशाच्या नव्या राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा
आज देशाच्या १४ व्या राष्ट्रपतीची घोषणा होणार आहे.
नवी दिल्ली : आज देशाच्या १४ व्या राष्ट्रपतीची घोषणा होणार आहे.
निवडणूक अधिकारी तसंच लोकसभा महासचिव अनूप मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ११ वाजता राष्ट्रपती निवडणुकीची मतमोजणी सुरू होणार आहे. सर्वात प्रथम संसदेतील बॅलेट बॉक्स खोलला जाईल. त्यानंतर ३१ विधानसभेत मतमोजणी केली जाईल. मतमोजणीचे आठ राऊंड झाल्यानंतर संध्याकाळी ५ वाजता निकाल घोषित केला जाईल.
राष्ट्रपतीपदासठी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात लढत आहे. यात रामनाथ कोविंद यांचं पारडं जड आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी १७ जुलैला विक्रमी ९९ टक्के मतदान झालं होतं. त्यामुळे विजयी अंतर किती असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ २४ जुलैला संपतोय. त्यामुळे २५ जुलैला नवे राष्ट्रपती शपथ घेतील.