नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडीसाठी उद्या मतदान होणार आहे. एनडीएकडून रामनाथ कोविंद आणि युपीएकडून मीरा कुमार यांच्यात राष्ट्रपतीपदासाठी सामना होणार आहे. राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल २० जुलैला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरातील एकुण ४ हजार ८५१ खासदार आणि आमदार या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. मात्र एनडीएचं संख्याबळ पाहता रामनाथ कोविंद यांचं पारडं जड आहे. कोविंद यांच्या पक्षात ६१ टक्के मतदान होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी खासदारांना हिरवा रंग तसेच आमदारांना गुलाबी रंगाचा बॅलेट पेपर देण्यात येणार आहे. पेपरमध्ये मीरा कुमार यांचं नाव पहिल्या क्रमांकावर असेल तर रामनाथ कोविंद यांचं नाव दुस-या क्रमाकांवर असेल.