नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या वादावर आज तोडगा काढण्यात यश येईल, अशी असल्याची आशा देशाचे अॅटर्नी जनरल के के वेणूगोपाल यांनी व्यक्त केलीय.
 
न्यायाधीशांनी पत्रकार परिषद टाळायला हवी होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयातले अंतर्गत वाद आजपर्यंत पुर्णपणे निवळतील असंही वेणूगोपाल यांनी सांगितलंय.
 
सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यामुळे आता देशातल्या घडामोडींना वेग आला. 


सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांनी अॅटर्नी जनरल के के वेणूगोपाल यांची भेट घेतली. तर दुसरीकडे या वादासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय कायदामंत्री रवी शंकर प्रसाद यांच्याशी फोनवरून चर्चा केली.