नवी दिल्ली : फळ-भाज्यांचे दर वाढले असतानाच आता सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा महागाईची झळ सोसावी लागणार आहे. कारण, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१ सप्टेंबर म्हणजेच आजपासून अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ८ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर, विना अनुदानित सिलिंडरची किंमत ७३.५० रुपये झाली आहे.


केंद्र सरकारने अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या दरात मार्चपर्यंत दर महिन्याला ४ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी महिन्याभरापूर्वी लोकसभेत दिलं होतं. त्यानंतर ही वाढ करण्यात आली आहे.


यापूर्वी सरकारने आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांना एलपीजी सिलिंडरच्या दरात प्रत्येक महिन्याला २ रुपयांनी वाढ करण्याचे आदेश दिले होते. पण नंतर सरकारने ४ रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला.


दिल्लीमध्ये अनुदानित सिलिंडरची किंमत ४७९.७७ रुपयांवरुन ४८७.१८ रुपये झाली आहे. तर विना अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत ५२४ रुपयांवरुन ५९७.५० रुपये झाली आहे.