नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय दलाच्या बैठकीत लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची चांगलीच परीक्षा घेतली. पीएम मोदींनी संसदेत गैरहजर राहणाऱ्या खासदारांना चांगलंच सुनावलं. त्यांनी म्हटलं की तुम्ही आणि मी काहीही नाही आहोत. सर्व काही पक्ष आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधानांनी बैठकीत खासदारांबाबत नाराजी बोलून दाखवली. त्यांनी म्हटलं आहे की, 'आता राज्यसभेत अध्यक्ष आले आहेत. आता तुमच्या मौज-मस्तीचे लक्षण बंद होतील. तुम्ही स्वत:ला काय समजता. तुम्ही काहीही नाही. मी काहीही नाही. सर्वकाही भाजप आहे. पक्ष आहे.'


त्यांनी पुढे म्हट़लं की, '३ लाईन व्हिप काय आहे ? पुन्हा-पुन्हा व्हिप द्यावा लागतो. हजर राहण्यासाठी सांगावं लागतं. २०१९ मध्ये मी बघतो.'