नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या २०० तरुण सीईओंशी नीती आयोगाच्या व्यासपीठावरून संवाद साधला. यावेळी बोलताना या तरुण सीईओंना मोदींनी देशाच्या आर्थिक प्रगतीचे सैनिक अशी उपमा दिली आहे. काळात देशाची आर्थिक प्रगती साधायची असेल, तर त्यासाठी चळवळ उभी करायाला हवी, असंही पंतप्रधानांनी यावेळी म्हटलं.  


देशात आयात कमी करणे, देशात रोखीच्या व्यवहारांवर नियंत्रण आणणे या सारख्या महत्वाच्या कामासाठी तरुण सीईओंच्या मदतीची गरज असल्याचंही मोदींनी म्हटलंय.  नीती आयोगानं दिल्लीतल्या प्रवासी भारतीय भवनात देशातल्या तरुण उद्योजकांसाठी एका परिषदेचं आयोजन केलं आहे. याच परिषदेत पंतप्रधान बोलत होते.