Independence Day | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्वातंत्र्यदिनाच्या देशवासियांना शुभेच्छा
स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे हजारो अनाम स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस...
नवी दिल्ली : आज स्वातंत्र्यदिन... स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आज आपण साजरा करतोय. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे हजारो अनाम स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस... देशाला नवी देणारं, स्वातंत्र्य, समता एकतेचं महत्त्व सिद्ध करणारा आजचा हा स्वातंत्र्यदिन देश साजरा करत आहे. अमृत महोत्सव दिनाचं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्या दिल्या आहेत. नववर्ष देशवासियांमध्ये नवी ऊर्जा आणि नवीन चेतना घेऊन येईल...असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मोदी ट्विट करत म्हणाले, 'स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अमृत महोत्सवाचा हा वर्ष देशवासियांमध्ये नवी ऊर्जा आणि नवीन चेतना घेऊन येईल... ' असं ट्विट करत त्यांनी समस्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आज संपूर्ण देशभर विविध कार्यक्रम साजरे होत आहेत. अर्थात कोरोना संकट आणि निर्बंधांचं सावट आजच्या स्वातंत्र्यदिनावर आहेच.
लाल किल्ल्यावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांनी ध्वजारोहण केल्यावर एमआय १७ हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव होणार आहे.... त्याआधी पंतप्रधान मोदी सकाळी राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत. लालकिल्ल्यावर पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल.