पंतप्रधान मोदींचे जकार्तामध्ये जंगी स्वागत
मोदींनी जकार्ता मधल्या इस्तिकलाल मस्जिदीला भेट दिली.
जकार्ता: पाच दिवसाच्या परदेश दौऱ्यातील पहिल्या टप्पात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी इइंडोनेशियाचे पंतप्रधान जोको विडोड यांच्याशी चर्चा करत आहेत.त्याआधी आज सकाळी त्यांनी इंडोनेशियात शहीदांना आदरांजली अपर्ण केली. जकार्तामध्ये मोदींच्या स्वागताला मोठ्या संख्येनं लहान मुलं उपस्थित होती. मोदींनी जकार्ता मधल्या इस्तिकलाल मस्जिदीला भेट दिली. त्यानंतर जकार्तामधल्याच कनवेंशन सेंटरमध्ये भारतीय वंशाच्या लोकांशी संवाद साधतील. पंतप्रधान संध्याकाळी इंडिया इंडोनेशिया सीईओ फोरमच्या बैठकीतही भाषण करतील.