अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या ६७ व्या वाढदिवशी सरदार सरोवर प्रकल्पाचं लोकार्पण केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सरदार सरोवर धरणाच्या स्वरुपात रिटर्न गिफ्ट दिलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकप्लाचं काम प्रलंबित होतं. अखेर आता या धरणाचं लोकार्पण करण्यात आलं आहे.


यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केंद्रीय मंत्री, नितीन गडकरी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी उपस्थित होते. या प्रकल्पाचे भूमिपूजन १९६१ मध्ये झाले होते. मात्र, विस्थापीतांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आणि त्यानंतर झालेल्या आंदोलनामुळे हा प्रकल्प रेंगाळला गेला होता.


पाहूयात या प्रकल्पाची वैशिष्ट्ये


- ५ एप्रिल १९६१ रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी सरदार सरोवर प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते


- या प्रकल्पामुळे गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांना वीज उपलब्ध होणार आहे.


- प्रकल्पासाठी ६५ हजार कोटी झाले खर्च


- १३८ मीटर उंच धरण


- देशातील सर्वात उंच धरण, अमेरिकेतील ग्रँड कुली धरणानंतर जगातील सर्वांत मोठं धरण


- धरणाला एकूण ३० दरवाजे, प्रत्येक दरवाजाचं वजन ४५० टन


- ४.७३ मिलियन क्यूबिक पाणी साठ्याची क्षमता


- या प्रकल्पामुळे ६००० मेगावॅट वीज निर्मिती होणार