लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशमधील वाराणसीच्या दौऱ्यावर आहे. आज विविध कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. नवग्रह वाटिकेत पिंपळ वृक्षारोपण करून पंतप्रधान आजच्या कार्यक्रमाची सुरूवात केली. पंडित दिनदयाळ संकुलात पंतप्रधानांच्या हस्ते भाजप सदस्य नोंदणी कार्यक्रमाला झाला. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समाजातल्या विविध स्तरातल्या ५ जणांना पंतप्रधानांच्या हस्ते भाजपाचं सदस्यत्व दिलं गेलं. विमानतळावर लालबहादूर शास्त्रींच्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री महेंद्र नाथ पांडे यांच्यासह अन्य मंत्रीही उपस्थित आहेत.