मुंबई : Monsoon Session 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) पहिल्याच दिवशी लोकसभेत भाषण करायला उठताच विरोधी पक्षांनी गदारोळ सुरू केला. काँग्रेस खासदारांनी लोकसभेत महागाईचा मुद्दा लावून धरला. यावेळी जोरदार हंगामा केला. मोदींच्या भाषणादरम्यान संसदेत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. महागाईच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळालेत.काँग्रेससोबत अकाली आणि बसपाचे खासदार शेतकऱ्यांच्या मुद्दय़ावर आक्रमक झालेत. (Lok Sabha Monsoon Session)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान म्हणाले की, मला वाटले की आज उत्साहाचा दिवस असेल परंतु विरोधी पक्ष दलित, महिला आणि ओबीसी लोक मंत्री बनवण्याच्या चर्चा पचवित नाहीत. मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत मंत्रीमंडळाची ओळख करून देत असताना ही टीका केली. हा गोंधळ पाहून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कोरोनादरम्यान मृत्यू पावलेल्या खासदारांविषयी माहिती द्यायला सुरुवात केली. तसेच विरोधकांच्या गदारोळानंतर बिर्ला यांनी हे संसदेच्या परंपरेला धरुन नसल्याचं सांगत संताप व्यक्त केला.



दरम्यान, पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅसच्या वाढत्या किंमतींचा निषेध व्यक्त करण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार सायकलवरून संसदेत पोहोचले.  विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना हे संसदेच्या परंपरेला धरुन नसल्याचं सांगत संताप व्यक्त केला. चांगल्या पंरपरा तोडल्या जात आहेत. सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाच्या संसदेत हे वागणं योग्य नाही असं त्यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले.


मोदी म्हणाले, मी आशा करतो की तुम्ही सगळ्यांनी लसीचा एकतरी डोस घेतला असेल. तरीही तुम्ही कोरोनाच्या प्रोटोकॉलचे पालन करा.  जेव्हा लस हातावर देण्यात येते तेव्हा तुम्ही बाहुबली बनता. कोरोनाविरुद्धच्या लढाईत जर तुम्हाला बाहुबली बनायचे असेल तर तुम्हाला हातावर लस घ्यावी लागेल. आतापर्यंत 40 कोटी पेक्षा जास्त लोके कोरोनाविरुद्धच्या लढाईत बाहुबली बनले आहेत. पुढे ही हे काम जोरात सुरु राहिल, असे मोदी यांनी म्हटले.