कन्याकुमारी : पंतप्रधानानी आज ओखी चक्रीयवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यामुळे प्रभावित लोकांची पंतप्रधानांनी यावेळी भेट घेतली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केरळ, तमिळनाडू आणि लक्षद्वीप किनारपट्टीच्या भागातील लोकांना पंतप्रधान मोदींनी भेट दिली. पंतप्रधानांनी प्रत्येक संभाव्य मदतीची प्रभावित लोकांना आश्वासन दिले. त्यापूर्वी पंतप्रधान मोदी लक्षद्वीपमध्ये पोहचले आणि तेथील प्रभावित क्षेत्राचा देखील आढावा घेतला. मोदींना येथे अनेक लोकांची भेट घेतली. मच्छिमार आणि शेतकरी प्रतिनिधींसह वादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांची पंतप्रधानानी विचारपूस केली.



पंतप्रधान लक्ष्द्वीपमध्ये ओकी चक्रीवादळातील बळी पडलेल्या कुटुंबीयांना देखील भेटले. मोदींचं लक्षद्वीपच्या विद्यार्थ्यांनी स्वागत केले. कन्याकुमारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चक्रीवादळानंतर सुरु असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणइ मुख्यमंत्री पलानीस्वामी तेथे उपस्थित होते.