नवी दिल्ली : गुजरातच्या कच्छमधून निवडणूक प्रचाराची सुरूवात करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुज जिल्ह्यातील आशापुरा माता मंदिरात दर्शन घेतले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदींनी इथे देवीचा आशिर्वाद घेतला आणि पूजा केली. त्यानंतर मोदींनी मंदिरासमोर उभ्या असलेल्या भक्तांचीही भेट घेतली. इथे पंतप्रधान मोदींचं स्वागत पारंपारिक पगडी आणि सदरी परिधान करून करण्यात आलं. 


महिला-पुरुषांची मोठी गर्दी



दर्शन घेतल्यावर मोदींनी मंदिरासमोर उभ्या महिलांना हात दाखवत अभिवादन केलं. त्यानंतर मोदी हे पुरूषांच्या गर्दीकडे गेले. इथे ते बराचवेळ थांबले. यावेळी त्यांनी तरूण, वयोवृद्ध सर्वांसोबत हस्तांदोलन केलं. आशापुरा माता मंदिरसमोर जमलेल्य गर्दीत काही मुस्लिमही होते.


मुस्लिम व्यक्तींसोबत चर्चा 


पंतप्रधान मोदींनी लाईनमध्ये उभ्या असलेल्या वयस्कर मुस्लिम व्यक्तीचा हात हातात घेऊन त्यांची विचारपूस केली. इतरही मुस्लिमांशी मोदींनी हात मिळवला आणि त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी उपस्थित लोकांनी लागोपाठ ‘भारत माता की जय’ आणि वंदे मारतमचा नारा दिला.


मोदींचा गुजरात दौरा


आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरात दौरा असून ते राजकोट, अमरेलीए आणि सूरतमध्ये सभा घेणार आहेत. ते २७ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान तब्बल ८ रॅलींना संबोधित करणार आहेत.