कोरोनाचा धोका वाढतोय, पंतप्रधान मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद
PM Narendra Modi to chair Covid review meet :देशात पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. कोविड रुग्णवाढीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.
नवी दिल्ली : PM Narendra Modi to chair Covid review meet :देशात पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. याठिकाणी पुन्हा मास्कची सक्ती करण्यात आली आहे. भविष्यात कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून भर देण्यात येत आहे. आता कोविड रुग्णवाढीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. बुधवारी म्हणजे 27 एप्रिलला ही व्हिडीओ कॉन्फरन्स होणार आहे. (Prime Minister Narendra Modi will again hold talks with the Chief Ministers of the states regarding corona outbreak in the country)
आरोग्य सचिव राजेश भूषण हे कोविड रुग्णवाढीसंदर्भात प्रेझेन्टेशन सादर करतील. या कोविड आढावा बैठकीत पंतप्रधान मोदी राज्यांना आणखी एक बूस्टर डोस मोफत देण्याचे आवाहन करु शकतात. त्याचसोबत काही निर्बंध पुन्हा लागू करण्यासंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे. दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. राजधानीत मास्क घालणं अनिवार्य करण्यात आलं आहे. मास्क न लावल्यास 500 रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
कोरोनाचा (Corona) जोर बऱ्यापैकी ओसरला आहे. त्यामुळे देशात कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आलेत. महाराष्ट्रात तर मास्क घालणंही ऐच्छिक केले आहे. सर्वांचा कोरोना गेलाय, असा समज झालाय. मात्र हा गैरसमज आहे. कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय. या कोरोनाने राजधानी दिल्लीत धुमाकूळ घालत आहे. दिल्लीत काल दिवसभरात 1 हजारापेक्षा कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीत 24 तासांमध्ये 1 हजार 83 जणांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. तर एकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. दिल्लीचा पॉझिटिव्ही रेट हा 4.48 इतका आहे.
तर दुसरीकडे जगभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. भारतातही चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जाते आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढला आहे. भारतात गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांची संख्या दोन हजाराने वाढली आहे. कोरोनाच्या XE या नव्या व्हेरियंटचे रुग्ण भारतात वाढत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाच्या या नव्या लाटेचा सर्वाधिक फटका बसतोय तो लहान मुलांना.