CORONA | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकूंचं कोरोनामुळे निधन
पंतप्रधान मोदी यांच्या कुटुंबातील व्यक्तींचं कोरोनामुळे निधन
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकू नर्मदाबेन मोदी यांचे कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पीएम मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी ही माहिती दिली. नर्मदाबेन मोदी या 80 वर्षांच्या होत्या आणि त्या पंतप्रधान मोदींचे वडील दामोदर दास मोदी यांच्या भावाची पत्नी होती.
अहमदाबादमधील न्यू रानीप भागात नर्मदाबेन मोदी आपल्या मुलासोबत राहत होत्या. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पीएम मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी सांगितले की, त्यांची काकू नर्मदाबेन यांना 10 दिवसांपूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तपासणी दरम्यान, त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं.'
प्रल्हाद मोदी यांनी सांगितले की नर्मदाबेन मोदी हे त्यांचे वडील दामोदर दास मोदी यांचे बंधू जगजीवन दास मोदी यांच्या पत्नी आहेत. त्यांचे काका जगजीवन दास यांचे बर्याच वर्षांपूर्वी निधन झाले आहे. नर्मदाबेन आपल्या मुलासह अहमदाबादमध्ये राहत होत्या.