नवी दिल्ली : भारत छोडो आंदोलनाला ७५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे संसदेमध्ये विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भाषण केलं. देशातल्या युवकांनी पुन्हा एकदा १९४७ सारखं वातावरण तयार करावं असं आवाहन मोदींनी केलं. तसंच या आंदोलनाबाबत पुढच्या पिढ्यांनीही माहिती घेणं आवश्यक असल्याचं मोदी म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९४२मध्ये करो या मरो हा नारा देण्यात आला होता. आता आम्ही करें, और करके रहेंगे, हा नारा देत आहोत, असं मोदी म्हणाले. २०१७ ते २०२२ या पाच वर्षांमध्ये आम्ही या भावनेनंच काम करू, अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली. आम्हाला गरिबी, निरक्षरता, कुपोषण आणि भ्रष्टाचारापासून देशाची मुक्तता करायची आहे, असं वक्तव्य मोदींनी केलं. गरिबी, निरक्षरता, कुपोषण और भ्रष्टाचारसे हम भारत को मुक्त करेंगे और करके रहेंगे, असं आश्वासन मोदींनी लोकसभेत दिलं.