लखनऊ : उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील  प्रियदर्शनी नारायणवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे मोठे प्रयत्न सुरू झाले आहेत. पोलिसांनी प्रियदर्शनीची चौकशी केल्यानंतर चार्जशीट तयार केली आहे. पण प्रियदर्शनी सांगते की तिला आता सामंजस्याने प्रकरण मिटवायचे आहे. या प्रकरणी 'झी मीडिया'सोबत झालेल्या संवादात प्रियदर्शनी म्हणाली की माझ्यामुळे कोणाचं करियर खराब होईल असं मला वाटत नाही. शिवाय माझं करीयर खराब होईल असं देखील मला वाटत नाही. हे प्रकरण सामंजस्याने मिटवं असं प्रियदर्शनीची इच्छा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुला तुझं करियर खराब होईल असं वाटतं का? असा प्रश्न प्रियदर्शनीला विचारण्यात आला. यावर प्रियदर्शनी म्हणाली, 'माझं करियर खराब होण्यापेक्षा मला एका निष्पाप इसमाला वाचवायचं आहे. तो (ड्रायव्हर) कोणाचा तरी मुलगा आहे. एका कुटुंबाचा भाग आहे. त्यामुळे मी असं करत आहे.'


पुढे प्रियदर्शनी म्हणाली, 'मी काही विचार करून क्रॉस एफआरआय दाखल केली नाही. त्याच्याकडे पैसे कमी आहेत. चुकी कोणाचीही असो कोणाचे प्राण जाता कामा नये. '  दरम्यान, प्रियदर्शिनीला शनिवारी कृष्णा नगर पोलीस ठाण्यात बोलावले होते. पोलिसांनी तिची चौकशी केली. सांगितले जात आहे की पोलिसांनी प्रियदर्शनीच्या शेजारी राहणाऱ्या लोकांचीही चौकशी केली आहे.