नवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी  वाड्रा या वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवू शकतात. अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार प्रियंका गांधी बनारसमधून निवडणूक लढविण्याच्या गंभीरतेने विचार करीत आहेत. त्यांनी त्यांच्यावतीने होय, असे म्हटले आहे. परंतु पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांना अंतिम निर्णय घ्यायचा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, प्रियंका गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या महासचिव पदाची सूत्रे घेतल्यानंतर त्या राजकारणात अधिक सक्रिय झाल्याआहेत. त्यांना पूर्व उत्तर प्रदेशचे प्रभारी देण्यात आले आहे. ही जबाबदारी स्विकारल्यानंतर प्रियंका या उत्तर प्रदेशातील काँग्रेससाठी सातत्याने प्रचार करीत आहेत.


उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या महिण्यात रायबरेली येथे एका कार्यकर्त्यांनी त्यांना प्रश्न विचारला. तुम्ही रायबरेलीतून निवडणूक का लढवत नाही. तुम्ही निवडणूक लढविली पाहिजे. त्यावर प्रियंका गांधी यांनी उत्तर दिले, वाराणसीतून का नाही? मात्र, प्रियंका गांधी याचे उत्तर सहज मिश्किलीत दिले होते. त्यानंतर अंदाज बांधण्यात सुरुवात झाली आहे. प्रियंका गांधी खरोखरच वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणुकीची तयारी करत आहेत, अशी चर्चा सुरु झाली आहे. 



२९ मार्चला काँग्रेस महासचिव पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक देशांच्या वाऱ्या केल्यात. अनेकांना गळाभेटी घेतल्या. मात्र, मोदी एकदा तरी मतदारसंघातील वाराणसीती एका गावात फिरले किंवा गेले आहेत का? गरिबांच्या काळजी घेतली का, त्यांना कधी मिठी मारली आहे का?, येथील गावांचा पत्ता नाही. ते काय करणार गावांचा विकास, असा हल्लाबोल प्रियंका यांनी केला. 


दरम्यान, आदिलपूर येथे एका जाहीर सभेत बोलताना प्रियंका यांनी मोदींवर जोरदार टीका केली. मोदी पाच वर्षांत केवळ खोटे बोलत आहेत. नव तरुण बेरोजगार असून ते नोकरीसाठी फिरत आहेत. त्यांना बेरोजगार तरुणांची किंमत नाही. पंतप्रधान यांना गरिबांसाठी वेळ नाही. भाजप सरकार सामान्यांच्या विरोधात आहे. शेतकरी विरोधी आहे. हे सरकार जनतेचे ऐकत नाही. त्यामुळे ते जनतेचे भले करु शकत नाही, अशी टीका प्रियंका यांनी केली.  


पंतप्रधान देश - विदेशात खूप फिरले आहेत. मात्र, आजही ते आपल्या मतदार संघात गेलेले नाही. त्यांना तेथील एकही गाव माहित नाही. त्यांनी कधी गरिबाची साधी गळाभेट घेतली आहे का?, असा थेट सवाल विचारला आहे.