मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड येथून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या देखील उपस्थित होत्या. राहुल आणि प्रियंका यांच्यात फक्त राजकीयच नाही तर कौटुंबिक देखील नातं आहे. अर्ज दाखल करताना प्रियंका गांधी यांनी रोड शो देखील केला. आपल्या भावाला मतदान करण्याचं आवाहन यावेळी त्यांनी केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंका गांधी यांनी यानंतर ट्विट करत म्हटलं की, 'माझा भाऊ, माझा खरा मित्र आहे. आणि तो एक शूर व्यक्ती आहे. वायनाडच्या जनतेने त्याच्यावर लक्ष ठेवावं. तो तुम्हाला निराश करणार नाही.'

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं की, मी केरळमध्ये यासाठी आलो आहे कारण येथील लोकांना मला संदेश द्यायचा आहे की, मी तुमच्यासोबत आहे. पंतप्रधान मोदी, भाजप आणि आरएसएसची भूमिका ही दक्षिण भारतीयांच्या विरोधात आहे. मला हा संदेश द्यायचा की मी उत्तर मधून पण लढेल आणि दक्षिणेतून पण लढेल. पण यादरम्यान बोलताना त्यांनी एकदाही सीपीएमवर टीका केली नाही.


राहुल गांधी यांनी म्हटलं की, 'मला वाटतं की, सीपीएमचे माझे भाऊ आणि बहिण माझ्या विरोधातील बोलतील. हल्ला करतील. पण मी त्यांच्या विरोधात काहीच बोलणार नाही.'