आग्रा : एका दिवसाच्या दौऱ्यासाठी आग्रा येथे आलेल्या कॉंग्रेसचे माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीदने प्रियंका गांधींबाबत  मोठे विधान केले आहे. कार्यकर्ता सम्मेलनात सलमान खुर्शीद यांनी म्हटले की, उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूकांमध्ये प्रियंका गांधी कॉंग्रेसचा चेहरा असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक 2022 साठी सर्व पक्ष  तयारीला लागले आहेत. भारतीय जनता पक्ष स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेसाठी काम करीत आहे तर, बसपा 2017च्या फॉर्मुल्याच्या आधारावर परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. सपा तर आर-पारच्या लढाईसाठी तयार आहे. परंतु यामध्ये कॉंग्रेस सध्यातरी कुठेच दिसत नाही. अशातच सलमान खुर्शीद यांनी केलेल्या राजकीय विधानामुळे युपीमध्ये कॉंग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूका लढणार हे स्पष्ट होत आहे. खुर्शीद यांनी म्हटले की, युपी निवडणूकांमध्ये पक्ष कोणत्याही इतर पक्षाची आघाडी करणार नाही. पक्षात नाराजी असलेल्यांची समजुत काढण्यात येणार आहे. 


22 महिन्यांनंतर प्रियंका अमेठीत
कॉंग्रेस महासचिव प्रियंका गांधी 22 महिन्यानंतर अमेठीच्या औचक दौऱ्यावर पोहचल्या होत्या. येथे त्यांनी मोहनगंजच्या टोडर गावातील त्या कुटुंबाची भेट घेतली. जेथे 6 दिवसांपूर्वी पडकी भींत पडल्याने तीन लहान मुलांचा मृत्यू झाला होता. प्रियंकांनी कुटुंबियांना सांत्वना देताना म्हटले की, ते कुटुंबाला शक्य ती सर्व मदत करतील. 


सोनिया गांधी यांच्या सोबत प्रियंका यांचा दौरा
23 जानेवारी 2020 मध्ये प्रियंका गांधी आपली आई आणि कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अमेठी दौऱ्यावर आल्या होत्या. प्रियंका यांनी अमेठीच्या भरेठा गावातील अपघातात 6 जणांचा मृत्यू झालेल्या कुटुंबाची भेट घेतली होती.