नवी दिल्ली :  जगातील सर्वात लहान सॅटेलाईट 'कलामसॅट' आज अवकाशात झेपावणार आहे. इस्त्रो ही कामगिरी करणार आहे.पोलर सॅटेलाईट लॉंच व्हीकल (PSLV) C-44 नुसार कलामसॅट आणि मायक्रोसॅट हे श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून अवकाशात उड्डाण घेतील. कलामसॅट सॅटेलाईट हे भारतीय विद्यार्थ्यांच्या समुहाने तयार केले आहे. भारताचे पूर्व राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन अशी ओळख असलेले प्रसिद्ध डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव या सॅटेलाईटला देण्यात आले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलामसॅट हे जगातील सर्वात लहान सॅटेलाईट आहे.



इस्त्रोला मदत  


अंतराळ जगतामध्ये एक नवा कारनामा करण्यास इस्त्रो सज्ज झाले आहे.



इस्त्रोने सॅटेलाईट लॉंचिंग मिशनमध्ये PS-4 प्लॅटफॉर्मचा वापर विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सॅटेलाईटसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. कलामसॅट इतके लहान आहे की त्याला 'फेम्टो'  श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. इस्त्रोचे वैज्ञानिक हे विद्यार्थ्यांना पूर्ण उपग्रह बनवण्या ऐवजी पे-लोड बनवण्यास प्रेरित करत आहेत. यातून इस्त्रोला मदत होणार आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेले पे-लोडना PS-4च्या माध्यमातून अंतराळात पाठवले जाणार आहेत.