जम्मू-कश्मीर : पुलवामामध्ये झालेल्या चकमकीत आठ जवान शहीद झाले आहेत. यामध्ये साताऱ्यातले सीआरपीएफ जवान रवींद्र धनावडे यांचाही यात समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत ८ जवान शहीद झाले आहेत. यामधील ४ जण जम्मू काश्मीर पोलीस दलातील असून ४ जण केंद्रीय राखीव पोलीस दलाचे आहेत. सातारा जिल्ह्यातल्या जावळीतल्या मेढा या गावचे रवींद्र धनावडे रहिवासी होते. जम्मू काश्मीर पोलिसांचे ४ जवान आणि सीआरपीएफचे ४ जवान या हल्ल्यात शहीद झालेत.


तर  चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले गेले आहे. पुलवामा जिल्हा पोलीस लाईनमध्ये पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी हा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात खात्मा करण्यात आलेल्या २ दहशतवाद्यांचे मृतदेह सुरक्षायंत्रणांनी ताब्यात घेतलेत.