मुंबई : देशातील आणखी एका सहकारी बँकेला (Bank) दोन दिवसांनी टाळं ठोकण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे (Rupee Co-operative Bank Ltd) बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या बँकेची बँकिंग सेवा 22 सप्टेंबरपासून बंद होणार आहे. या बँकेत खाते असल्यास ताबडतोब  पैसे काढा, अन्यथा 22 सप्टेंबरनंतरखात्यातून पैसे काढू शकणार नाही, असं आवाहनही खातेधारकांना करण्यात आलंय. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यामुळे रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लि.ला टाळं लागणार आहे. (pune rupi sahakari bank banking services will be closed from 22 September 2022 after rbi taken action)


उरले फक्त 2 दिवस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑगस्टमध्ये रिझर्व्ह बँकेने पुण्यातील रुपी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. बँक  22 सप्टेंबरला आपलं सर्व कामकाज कायमचं   बंद करणार आहे. त्यामुळे खात्यातून पैसे काढण्यासाठी खातेधारकांकडे अवघे 2 दिवस शिल्लक आहेत. यानंतर ग्राहक त्यांचे पैसे काढू शकणार नाहीत. आरबीआयनुसार, रुपी सहकारी बँक लिमिटेडची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट होती. तसेच बँकेकडे कोणतेही भांडवल शिल्लक नव्हते. यामुळे केंद्रीय बँकेने त्यांचा बँकिंग परवाना रद्द केला.


RBIची ऑगस्टमध्ये घोषणा


आरबीआयने रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर बँकिंग नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल मोठी कारवाई केली आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नसल्याने रूपी सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आला. रिझर्व्ह बँकेने ऑगस्ट महिन्यात ग्राहकांना याबाबत माहिती दिली होती.


रिझर्व्ह बँकेने 10 ऑगस्टला एक प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली होती. यामध्ये रुपी सहकारी बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना 6 आठवड्यांनंतर रद्द करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. यानंतर बँकेच्या सर्व शाखा बंद होतील आणि ग्राहकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. आता 22 सप्टेंबरपासून रिझर्व्ह बँकेचे आदेश लागू होणार असून रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचे कामकाज ठप्प होणार आहे.