लुधियाना : आपल्या कुटुंबातील सात सदस्यांच्या कुटुंबाचा खर्च चालवण्यासाठी दहा वर्षाचा वंश सिंह लुधियानाच्या रस्त्यावर मोजे विकत आहे. वंशचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग वंशची मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. त्यांनी वंशच्या अभ्यासाचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी वंशच्या कुटुंबीयांसाठी तातडीने दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल झालेला वंशचा व्हीडीओ लोकं मोठ्या संख्येने शेअर करत आहे. या व्हीडीओमध्ये तुम्हा पाहू शकता की, लोकं मोज्यांच्या किंमतीपेक्षा वंशला 50 रुपये जास्त देत आहेत. परंतु वंश ते जास्तीचे 50 रुपये घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे या व्हीडीओमुळे प्रभावित होऊन सिंह यांनी शुक्रवारी वंश आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी व्हीडीओ कॉलद्वारे संपर्क केला आणि सांगितले की, वंशच्या स्वाभिमानाने ते प्रभावित झाले आहेत.



पंजाब सरकार वंशच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार आहे. त्यामुळे वंश पुन्हा शाळेत जाईल याची काळजी घ्यावी, अशा सूचना कॅप्टन यांनी लुधियानाच्या उपायुक्तांना दिल्या आहेत. वंशचे वडील परमजीत देखील मोजे विकतात आणि त्याची आई राणी या गृहिणी आहेत. त्यांच्या कुटुंबात तीन बहिणी आणि एक मोठा भाऊ असे सात सदस्यांचे ते कुंटुंब आहे. त्यांचे कुटुंबीय लुधियानामधील हाइबोवल भागात भाड्याच्या घरात राहतात.



पंजाबमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन


सीएम अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी खबरदारी म्हणून काही नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्यामध्ये दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ही पावले उचलून कोठेही गर्दी जमवू नये आणि कोरोनाचा प्रसार वाढू नये हा आमचा प्रयत्न आहे. ते म्हणाले की, कोरोनाचा नवीन स्ट्रेन पंजाबमध्ये वेगाने पसरत आहे आणि तो छोट्या शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर पसरला आहे.