चंदीगढ : Bhagwant Mann Marriage: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उद्या चंदीगढ येथील त्यांच्या घरी डॉ. गुरप्रीत कौर यांच्यासोबत एका खासगी समारंभात विवाहबद्ध होणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री मान यांचा 6 वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम आदमी पार्टीचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहेत. भगवंत मान शादी यांचे लग्न गुरुवारी 7 जुलै रोजी त्यांच्या निवासस्थानी साध्या पद्धतीने होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. भगवंत मान यांचा सहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला असून त्यांची पहिली पत्नी आणि मुले अमेरिकेत राहतात. भगवंत मान यांची दोन्ही मुले शपथविधी सोहळ्याला आली होती.


कोण आहे भगवंत मान यांची पत्नी?


पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या आई हरपाल कौर यांना आपल्या मुलाने पुन्हा लग्न करावे, अशी इच्छा होती. भगवंत मान यांचा विवाह मुख्यमंत्र्यांच्या आई आणि बहिणीने स्वतः निवडलेल्या डॉ. गुरप्रीत कौर यांच्याशी होणार आहे.



भगवंत मान यांचा विवाह त्यांच्या घरात एका छोट्याशा खासगी समारंभात होणार आहे. या सोहळ्याला फक्त कुटुंबातील सदस्यच उपस्थित राहणार आहेत. आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद देतील.


करिअरची सुरुवात विनोदी कलाकार  


भगवंत मान यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात कॉमेडियन म्हणून केली. 2008 मध्ये त्यांनी कपिल शर्मासोबत 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टीव्ही शोमध्ये भाग घेतला. यानंतर भगवंत मान यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्येही काम केले. 'कचरी' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यांनी 12 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.