पंजाब : पंजाब विधानसभा निवडणुकीचे (Punjab Election 2022) बिगूल वाजलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्योरोप केलं जात आहे. पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांच्यावर त्यांच्या बहिणीने गंभीर आरोप केले आहेत. अमेरिकेत राहणाऱ्या डॉ सुमन तूर यांनी नवज्योत सिंह सिद्धू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (punjab congress state president navjot singh sidhu has been accused by his sister suman toor)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"नवज्योतने वडिल भगवंत सिद्धू यांच्या मृत्यूनंतर आई निर्मल भगवंत आणि बहिणींना घरातून बाहेर काढलं. सिद्धूने लोकांना खोटं सांगितलं की तो 2 वर्षांचा असताना आई-वडील विभक्त झाले होते", असे आरोप तूर यांनी केले आहेत.  


तूर काय म्हणाल्या? 


"आईचा दिल्ली रेल्वे स्टेशनवर बेवारस स्थितीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी मी नवज्योतला भेटण्यासाठी अमृतसरमधील घरी गेले होते. मात्र त्याने घराचं गेटही उघडलं नाही. इतकंच नाही तर त्याने मला व्हॉट्सअपवरही ब्लॉक करुन ठेवलंय", असं सूमर तूर यांनी स्पष्ट केलं.


"नवज्योत फार क्रूर आहे. वडील भगवंत सिद्धू यांचं 1986 मध्ये उत्तरकार्य पार पडलं. त्यानंतर लगेचच सिद्धूने आईसोबत मला घरातून बाहेर काढलं. आईने तिची प्रतिमा वाचवण्यासाठी दिल्लीत फेऱ्या मारल्या आणि शेवटी दिल्ली रेल्वे स्टेशनवरच तिचा मृत्यू झाला. सिद्धूने हे सर्व संपत्तीसाठी केलं", असा आरोप सुमन तूर यांनी केला.  


वडिलांच्या मृत्यूनंतर आईला घराबाहेर काढलं


"नवज्योतच्या सासूने आमचं घर उद्धवस्त केलं. मला कधीच वडिलांच्या घरी जाता आलं नाही",अशी खंतही तूर यांनी व्यक्त केली.   


तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरच तुम्ही असे आरोप का करत आहात, असा प्रश्न तूर यांना विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या "मला ते कागदपत्र मिळवायचे होते, ज्यात नवज्योतने आई-वडिल विभक्त होण्याबाबतचं वक्तव्य केलं होतं. सिद्धूने यांनी आई-वडील विभक्त झाल्याचं वक्तव्य हे एका मुलाखतीदरम्यान केलं होतं. तीच मुलाखत मी शोधत आहे. तो लेख मला सापडला. यानंतर मी नवज्योतला भेटायला गेले. नवज्योतने सार्वजनिकरित्या केलेल्या वक्तव्याबाबत आई-वडिलांबाबत माफी मागावी असं सांगायचं होतं. मात्र नवज्योतने माफी मागण्यास नकार दिला", असंही तूर यांनी नमूद केलं. 


पत्नीकडून आरोपांचं खंडन


दरम्यान सुमन यांनी केलेल्या आरोपांचं नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीने खंडन केलं आहे. "सिद्धूंच्या वडिलांची 2 लग्न झाली होती. त्यांना पहिल्या पत्नीपासून 2 मुली होत्या. मात्र मी आणि सिद्धू त्यांच्याबाबत आम्हाला काही माहिती नाही", असं नवज्योत सिद्धू यांच्या पत्नीने नमूद केलं.