ड्रग्ज तस्करांना मृत्यूदंड, राज्य सरकारचा फैसला
आपल्याकडून केंद्र सरकारकडे याबद्दलचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय` असं म्हटलंय
चंदीगड : पंजाबमध्ये ड्रग्जचा धंदा दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे... यावरच भविष्यातील धोका टाळण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या अध्यतेखाली झालेल्या पंजाब कॅबिनेटच्या बैठकीत ड्रग्ज तस्करी आणि पॅडलिंग करणाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आलीय. यासाठी पंजाब सरकारकडून केंद्र सरकारला एक औपचारिक प्रस्तावही धाडण्यात आलाय.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी 'नशेच्या आधीन झालेली एक पीढी याला बळी पडतेय. नाश येणाऱ्या पीढिला पूर्णत: उद्ध्वस्त करतेय. यासाठीच आम्ही ड्रग्ज व्यवसायाला मूळापासूनच संपवण्यासाठी या धंद्यातील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केलीय. आपल्याकडून केंद्र सरकारकडे याबद्दलचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय' असं म्हटलंय.
ड्रग्जचा व्यापार हा राज्यातील मोठी समस्या आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच, पंजाबमध्ये ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या सर्वात मोठ्या तस्कराची माहिती मिळाल्याचा दावा केला होता. हा ड्रग्ज तस्कर हाँगकाँगच्या तुरुंगात बंद आहे आणि पंजाबमध्ये ड्रग्जचा व्यवसाय करतोय, असाही दावा करण्यात आलाय.