Big decision on families of martyrs: दंगल असो की नैसर्गिक आपत्ती, नागरिकांच्या सेवेसाठी पोलीस चोवीस तास तैनात असतात. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांना सुरक्षित आणि निर्भय वातावरण देण्याचे काम पोलिसांवर असतं. कोणताही सण, उत्सव असला तरी पोलिस कुटुंबापासून दूर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करत असतात. संकटप्रंसगी प्राणाची बाजी लावण्यातही पोलीस मागे पुढे पहात नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पंजाबच्या आप सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंजाब पोलीस दलात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना एक कोटींची मदत मिळणार आहे. पंजाब सरकारने (Punjab Government) आजही ही मोठी घोषणा केली आहे. 


अरविंद केजरीवाल यांनी पूर्ण केलं आश्वासन
पठाणकोटमधील तिरंगा यात्रेत अरविंद केजरीवाल यांनी जनतेला हे वचन दिलं होतं. आता सरकार स्थापनेनंतर केजरीवाल यांनी हे आश्वासन पूर्ण केलं आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ड्युटीवर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.


पोलीस वेलफेअर निधीतही वाढ
पंजाब पोलिसांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून पोलिसांना संबोधित करताना मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ही घोषणा केली. यासोबतच पोलीस कल्याण निधीही 10 कोटींवरून 15 कोटी करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली आहे.


पोलिसांच्या कामात हस्तक्षेप नाही
पोलिसांच्या कामात सरकार हस्तक्षेप करणार नाही, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात पोलिस कर्मचाऱ्यांना दिली आहे.