चंदीगड : कोरोनाचा फैलाव थांबयचे नाव घेत नाही. असे असले तरी कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, देशात आणखी एका मंत्र्याला कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले आहे. पंजाबचे उच्च शिक्षण मंत्री तृप्त राजिंदर सिंह बाजवा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या पहिला अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१० जुलै रोजी कॅबिनेट मंत्री राजिंदर सिंह बाजवा यांनी आपली कोरोना टेस्ट केली होती. याआधी देखील राज्यातील अनेक उच्च अधिकाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत. पण राज्य सरकारच्या मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची पहिलीच घटना आहे. त्यामुळे पंजाब सरकारमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 



बाजवा यांची अनेक उच्च अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत एक अधिकारी पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर बाजवा यांनी कोरोना चाचणी केली. मात्र पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला. होता. तसेच या दरम्यान राज्याचे आरोग्य मंत्री बलवीर सिंह सिद्धू यांचे देखील कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. 


दरम्यान, बाजवा यांची तब्येत मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होती. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा कोरोनाची टेस्ट करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र, दुसऱ्यांना बाजवा यांनी टेस्ट केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर बाजवा यांच्या खासगी स्टाफ ची तपासणी सुरु करण्यात आली आहे. स्टाफच्या सर्व सदस्यांना लवकरच क्वारंटाइन केले जाणार आहे. 


आता बाजवा यांना मोहालीमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाजवा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी एक ट्विट करत त्यांना लवकरात लवकर ठीक होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, माझ्या मंत्रिमंडळातील माझे सहयोगी तृप्त राजिंदर सिंह बाजवा यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ते लवकरात लवकर पूर्ण पणे तंदुरुस्त व्हावेत अशी प्रार्थना करतो.