Sarkari Naukri : राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी
PMB बँकेत 18 ते 20 वयोगतील उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी आहे.
नवी दिल्ली : Punjab National Bank मध्ये १२ पास विद्यार्थांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे. बँकेने शिपाई (Peon in PNB) पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांसाठी बँकेने नोटिफिकेशन देखील जारी केलं आहे. या नोटिफिकेशनद्वारे PMB मध्ये वेग-वेगळ्या 111 पदांसाठी भरती होणार आहे. पंजाब नॅशनल बँकेत नोकरी मिळवण्यासाठी ऍप्लिकेशन फॉर्म भरावा लागणार आहे. त्यामुळे आता १२वी पास उमेदवारांसाठी आनंदाची गोष्ट आहे.
पंजाब नॅशनल बँकेने 111 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. उमेवार ज्या शाखेत अर्ज भरत आहेत, त्याच शाखेत उमेदवारांना अर्ज जमा करावा लागणार आहेत.
Bangalore ईस्ट- 25 पद
Chennai साउथ – 20 पद
Balasore – 19 पद
Bangalore वेस्ट – 18 पद
Haryana – 19 पद
Surat – 10 पद
अर्ज करण्याऱ्या उमेदवाराची पात्रता 12वी उत्तीर्ण असली पाहिजे. शिवाय उमेदवाराला इंग्रजी भाषेचं ज्ञान असायला हवं. उमेदवाराचं वय 1 जानेवारी 2021 मध्ये 18 ते 20 वर्ष असणं बंधनकारक आहे. कोट्यात असलेल्या उमेदवारांना नियमानुसार वयाची सवलत देण्यात येईल.
अर्ज भरण्याची अंतिम तारीख
- चेन्नईमध्ये अंतिम तारीख - 22 फेब्रुवारी 2021
-Bangalore पश्चिमसाठी अंतिम तारीख - 27 फेब्रुवारी 2021
- Surat, Bangalore पूर्व आणि Balasore साठी अंतिम तारीख - 1 मार्च 2021
- Haryana साठी अंतिम तारीख - 4 मार्च 2021
कशी असेल निवड प्रक्रिया
उमेदवारांना शिपाई पदासाठी लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. शिपाई पदाच्या जागांसाठी 10वी आणि 12वीच्या मार्कांच्या आधारावर उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या https://www.pnbindia.in/ संकेतस्थळाला भेट द्या.