पंजाबमध्ये राजकीय घडामोडी वेगानं सुरू आहेत. आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी कोण असणार याच्या नावाची घोषणा कऱण्यात आली आहे. चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. हरिश रावत यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. काँग्रेसच्या बैठकीत चरणजीत सिंह चन्नी मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सर्वांनी शिक्कामोर्तब केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये 2 उपमुख्यमंत्री असणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुखजिंदर सिंह रंधावा यांचंही नाव चर्चेत होतं मात्र आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. गुजरातनंतर पंजाबमध्ये देखील कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. ते नाराज असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी सोनिया गांधींनाही याबाबत पत्र लिहिलं होतं. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर पंजाबमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला.





कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, अमरिंदर सिंग हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय झाले होते, म्हणूनच त्यांना हटवण्यात आलं.