Ram Mandir QR code scam : रामजन्मभूमी मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अयोध्येत 22 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्येत (Ayodhya Ram Mandir) हा सोहळा पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर अयोध्येत भव्य राममंदिर उभारणार असल्याची घोषणा मोदी सरकारने केली होती. त्यामुळे आता देशभरात आनंदाचं वातावरण आहे. 14 डिसेंबरपासून रामजन्मभूमी परिसराचा पूर्ण ताबा एसपीजीकडे गेल्यानंतर आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचलीये. अशातच आता राम मंदिराच्या नावाखाली लुटमार केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामभक्तांची फसवणूक केली जातीये. क्यूआर कोड दाखवून राम मंदिरासाठी देणगी म्हणून देशातील रामभक्तांकडून पैसे उकळले जात आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ता विनोद बन्सल यांनी दिली आहे. तसेच त्यांनी अशा घटनांपासून रामभक्तांनी सावध राहावे, असा इशाराही दिलाय. रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी कोणत्याही संस्थेला अशाप्रकारे निधी गोळा करण्यास सांगितलं नसल्याची माहिती त्यांनी दिलीये. त्याचबरोबर त्यांनी सावध राहण्याचा सल्ला देखील दिलाय.


राम भक्तांची फसवणूक म्हणजे राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. अयोग्य मार्गाने लोकांकडून पैसा उकळला जात आहे. पोलिसांनी भक्तांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी केलीये. केंद्रीय गृहमंत्री कार्यालय, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पोलिस प्रमुखांकडे कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केलीये.



दरम्यान, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेची तयारी देशभर सुरू आहे. प्राणप्रतिष्ठापनेचा भव्य सोहळा 22 जानेवारीला होणार आहे. सोमवारी मृगाशिरा नक्षत्रातील मुहूर्त खास असल्याचं सांगितलं जात आहे. हा शुभमुहूर्त पुण्यातील पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी काढला आहे. भारतातील सर्व 140 कोटी बंधू-भगिनींनी 22 जानेवारीला रामलल्ला जेव्हा अयोध्येत विराजमान होतील, तेव्हा रामज्योती प्रज्वलित करावी, अशी विनंती नरेंद्र मोदी यांनी केली होती.