नवी दिल्ली : बंगळुरूमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर भाजप समर्थक निखिल दधीच नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवरून वादग्रस्त ट्विट करण्यात आलं. पंतप्रधान मोदी या ट्विटर अकाऊंटला फॉलो करत असल्यानं त्यावरून बराच वादही निर्माण झाला. यावर आज भाजपनं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ दधीच यालाच नाही तर घोटाळ्यांच्या प्रकरणात ज्यांचं नाव आहे अशा राहुल गांधी यांना आणि जे नेहमी मोदींच्या नावानं खडे फोडतात अशा अरविंद केजरीवाल यांनाही ट्विटरवर फॉलो करतात, असं स्पष्टीकरण भाजपनं दिलंय.


जर पंतप्रधान नरेंद्र मोदी एखाद्याला सोशल मीडियावर फॉलो करत असतील तर त्याचा अर्थ असा नाही की त्याला कॅरेक्टर सर्टीफिकेट मिळालंय, असं भाजपच्या आयटी सेलचे अध्यक्ष अमित मालविय यांनी ट्विटरवर म्हटलंय.  


या निखिल दधीच नावाच्या अकाऊंटवरून गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर आक्षेपार्ह विधान करत या हत्येचं समर्थनच केलं होतं.