बाबा राम रहीमला अटक झाल्यावर राधे मॉं म्हणते..
बलात्काराच्या गुन्ह्यात न्यायालयाने दोषी ठरवल्यावर बाबा राम रहीम याला अटक झाली. बाबाच्या अटकेवर राधे मॉंनेही प्रतिक्रीया दिली आहे. राधे मॉं ही सुद्धा आपल्या विवीध कारनाम्यांमुळे सतत चर्तेत असते हे विशेष.
नवी दिल्ली : बलात्काराच्या गुन्ह्यात न्यायालयाने दोषी ठरवल्यावर बाबा राम रहीम याला अटक झाली. बाबाच्या अटकेवर राधे मॉंनेही प्रतिक्रीया दिली आहे. राधे मॉं ही सुद्धा आपल्या विवीध कारनाम्यांमुळे सतत चर्तेत असते हे विशेष.
बाबा राम रहीम प्रकरणावर राधे मॉंने मोठी प्रतिक्रीया दिली. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, 'ज्यांचे घर काचेचे असेल त्यांनाच धक्का बसला आहे. माझे घर तर दगडांचे असल्या'चे राधे मॉंने म्हटले आहे. दरम्यान, राधे मॉंने बाबा राम रहीमवर थेट शब्दात प्रतिक्रीया व्यक्त करणे टाळले असले तरी, अप्रत्यक्षपणे राधे मॉंने आपले मत व्यक्त केले आहे. बाबांवर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. असे विचारताच 'मी तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही संत मानते. त्यामुळे मोदी जो निर्णय घेतील तो योग्यच असेन.', असे राधे मॉंने म्हटले आहे. तसेच, विविध प्रश्नांना उत्तरे देताना, 'माझ्यापुढे शिवपेक्षा कोणीही मोठे नाही. मला संसार अत्यंत प्रिय आहे. माझी मुले माझ्यावर प्रेम करतात आणि त्यात मी खूश आहे. इतर गोष्टींवर मला कोणतेही भाष्य करायचे नाही', असेही राधे मॉंने म्हटले आहे.
पंचकूलाच्या सीबीआय न्यायालयाने डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम सिंग यांना बलात्कार प्रकरणी दोषी ठरवले. त्यानंतर पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. एकट्या पंचकूलातच सुमारे २८ लाकांचा मृत्यू झाला. तर, सिरसामध्ये ३ लोकांचा मृत्यू झाला. या प्रकरणात वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यू झालेल्या लोकांचा आकडा आता ३७वर गेला आहे. दरम्यान, दिल्ली, नोएडा आणि गाजियाबादमध्येही काही ठिकाणी हिंसाचार झाला आहे. बाबासमर्थकांनी ट्रेन, बस आदी ठिकाणी जाळपोळ केली आहे. त्यामुळे हरियाणा आणि दिल्लीत कलम १४४ लावण्यात आले आहे. उत्तराखंड मध्येही कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तर, उत्तर प्रदेश, बागपत, गाझियाबात आदी ठिकाणी शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. काही ठिकाणी सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे.