स्टुडिओमध्ये घुसुन रेडिओ आरजेची हत्या
मदावूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. काही हल्लेखोरांनी रेडिओच्या स्टुडिओमध्ये जाऊन रेडिओ जॉकीची हत्या केली आहे. या हल्लात राजेश यांचा मित्र कुट्टन देखील जखमी झाला आहे. राजेश हे आरजे रसिकन राजेशच्या नावाने प्रसिद्ध होते.
केरळ : मदावूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. काही हल्लेखोरांनी रेडिओच्या स्टुडिओमध्ये जाऊन रेडिओ जॉकीची हत्या केली आहे. या हल्लात राजेश यांचा मित्र कुट्टन देखील जखमी झाला आहे. राजेश हे आरजे रसिकन राजेशच्या नावाने प्रसिद्ध होते.
राजेश आपल्या मित्रासोबत एक स्टेज शो करण्यासाीठी गेले होते. सोमवारी रात्री 2 वाजता ते ऑफिसला आले. येथे ते आपलं सामान ठेवण्यासाठी आले होते. तेव्हा कारमधून आलेल्या ३ हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. राजेश यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मित्र देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
राजेश यांचं ऑफिस मदवूर स्थित पल्लिकल पोलीस स्टेशन जवळ आहे. 36 वर्षीय राजेश एक चांगले मिमिक्री आर्टिस्ट होते. सोबतच ते एक फोल्क सिंगर होते. राजेश "मेट्रो स्टेशन" नावाचं स्वत:चं रेडिओ चॅनेल चालवायचे. याआधी राजेश रेड एफएममध्ये देखील काम करत होते. त्यानंतर दोहामध्ये "वॉइस ऑफ केरलामध्ये त्यांनी काम केलं. काही दिवसांपूर्वीच ते दोहामधून आले होते.