संसदेत वाद सुरू असतानाच भारतात तीन `राफेल जेट` दाखल
एअरो इंडिया शो २० ते २४ फेब्रुवारीपर्यंत बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आलाय
बंगळुरू : बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'एअरो इंडिया शो'मध्ये सहभागी होण्यासाठी बुधवारी तीन राफेल लढावू विमान भारतात दाखल झालेत. फ्रान्सच्या वायुसेनेची ही विमानं संसदेदत 'राफेल' खरेदीवर वाद सुरू असतानाच दाखल झालीत, हे विशेष... काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि विरोधकांनी यांनी या राफेलच्या किंमतीच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदी सरकारला घेरलंय.
एअरो इंडिया शो २० ते २४ फेब्रुवारीपर्यंत बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आलाय. यामध्ये एकूण ५७ एअरक्राफ्ट सहभागी होणार आहेत. यासाठीच फ्रान्सच्या वायुसेनेनं आपली तीन राफेल लडावू विमानं भारतात धाडली आहेत. यातील दोन विमानं बुधवारी भारतात दाखल झाली. एअरो इंडिया शो दरम्यान भारतीय वायुसेनेशिवाय इतरही अधिकारी ही लढावू विमानं उडवण्याचा अनुभव घेणार आहेत... यामध्ये वायुसेनेच्या डेप्युटी चीफ एअर मार्शल विवेक चौधरी यांचाही समावेश असेल.
दुसरीकडे, बुधवारी १६ व्या लोकसभेच्या १७ व्या सत्राचा अंतिम दिवस होता. या दिवशीच राफेल खरेदीवर बहुप्रतिक्षित कॅग अहवाल संसदेत सादर करण्यात आला. हा कॅग अहवाल मोदी सरकारला दिलासा देणारा असल्याचं दिसंतय. कॅग अहवालानुसार, सद्य एनडीए सरकारनं केलेली राफेल डील यूपीए सरकारच्या तुलनेत २.८६ टकक्यांनी स्वस्त आहे.
मोदी सरकारनं जुना खरेदी व्यवहार रद्द करत २०१५ साली फ्रान्ससोबत ३६ राफेल विमानांच्या खरेदीसाठी गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट व्यवहाराची घोषणा केली होती.