Success Story: मुंबईतल्या झोपडपट्टीतला जन्म, 15 व्या वर्षीच सुटली शाळा; बनले 726.51 अब्जच्या कंपनीचे मालक
Inder Jaisinghani Success: इंदर जयसिंघानी यांचा जन्म मुंबईतील लोहार चाळीत झाला. इंदर सिंघानिया यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले.
Inder Jaisinghani Success: एखादी व्यक्ती यशस्वी झाली की तिच्यापासून अनेक तरुण प्रेरणा घेतात. पण व्यक्तींनी यशस्वी होण्याआधी खूप मोठा काळ संघर्ष पाहिलेला असतो. अशीच एक कहाणी आपण जाणून घेणार आहोत. एक अशी व्यक्ती जिने सामान्य कुटुंबात जन्म घेऊन हजारो कोटींचे व्यवसायाचे साम्राज्य कसे निर्माण केले ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पॉलिकॅब इंडिया लिमिटेडचे प्रमुख आणि व्यवस्थापकीय संचालक इंदर सिंघानिया यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. फोर्ब्सच्या 100 श्रीमंत भारतीयांच्या यादीतही त्यांचा समावेश झाला आहे.इंदर यांच्याकडे इतकी संपत्ती कशी आली? मुंबईच्या झोपडपट्टीत बालपण गेलेला एक मुलगा श्रीमंतांच्या यादीत जाऊन कसा बसतो? यासाठी त्यांनी कोणता व्यवसाय केला? त्यांना कसे यश-अपयश मिळत गेले? याबद्दलचे प्रश्न तुमच्या मनात आले असतील. त्याबद्दल जाणून घेऊया.
जयसिंघानी यांचा जन्म मुंबईतील लोहार चाळीत झाला. इंदर सिंघानिया यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. इंदर हे लहान असताना त्यांचे वडील वारले. त्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. त्यामुळे शाळा सोडणे त्यांच्यासाठी नाइलाज होता. इंदर यांनी शाळा सोडून नोकरी करण्याचा पर्याय निवडला.
एका वर्षात दुप्पट संपत्ती
फोर्ब्स इंडियाने नोव्हेंबर २०२३ मध्ये जारी केलेल्या यादीनुसार, पॉलीकॅब इंडियाचे अध्यक्ष जयसिंघानी यांची एकूण संपत्ती ६.४ अब्ज डॉलर इतकी आहे. 2022 ते 2023 या अवघ्या एका वर्षात त्याच्या संपत्तीत $3.35 अब्जची प्रचंड वाढ झाली. यापूर्वी 2022 मध्ये ते 60 व्या स्थानावर होते. 2023 मध्ये ते 32 व्या स्थानावर पोहोचले होते. पॉलीकॅबचे मुंबई मुख्य कार्यालय जानेवारी 1996 मध्ये सुरू झाले. ही कंपनी वायर आणि केबल्स, इलेक्ट्रिक पंखे, एलईडी दिवे आणि ल्युमिनियर्स, स्विच आणि स्विचगियर, सौर उत्पादने तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
जगभरातील 70 हून अधिक देशांमध्ये व्यवसाय
70 वर्षीय अब्जाधीश उद्योगपती इंदर जयसिंघानी यांनी 1986 मध्ये आपल्या भावांसोबत ट्रेडिंग फर्म सुरू केली होती. सुरुवातीला ते कमिशनच्या आधारे इतर कंपन्यांचा माल बाजारात विकायचे. याआधी 1968 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी शाळा सोडली आणि कौटुंबिक व्यवसाय सांभाळला. यात त्यांना त्यांचे मोठे बंधू गिरधारीलाल यांनी मदत केली. पॉलीकॅब इंडियाच्या मुंबई मुख्य कार्यालयाने जानेवारी 1996 मध्ये कामकाज सुरू केले. डिसेंबर 1997 मध्ये इंदर जयसिंघानी यांची कंपनीचे अध्यक्ष आणि संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. ऑगस्ट 2019 मध्ये त्यांची पुन्हा अध्यक्ष आणि एमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली. जयसिंघानी यांनी पॉलिकॅब इंडिया लिमिटेडला भारतातील सर्वात मोठी वायर आणि केबल निर्माता बनवले आहे. ही कंपनी सर्वात वेगाने वाढणारी एफएमसीजी कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीने भारतातील विविध शहरांमध्ये उत्तम सेवा देत नागरिकांचा विश्वास कमावला. यानंतर जगभरातील 70 हून अधिक देशांमध्ये ग्राहकांना सेवा पुरवली.
कहाणी दृढ संकल्प आणि कठोर मेहनतीचे उत्तम उदाहरण
इंदर जयसिंघानी यांची कहाणी दृढ संकल्प आणि कठोर मेहनतीचे उत्तम उदाहरण आहे. मुंबईतील झोपडपट्टीतून त्यांनी सुरुवात करत आज देशातील श्रीमंतांच्या यादीत स्वत:ला नेऊन ठेवले.अनेक प्रसंग आले पण त्यांनी प्रसंगाला स्वत:वर ओझं होऊ दिलं नाही. इंदर यांची कहाणी अशा तमाम तरुणांसाठी प्रेरणादायी आहे, जे आपली स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा ठेवतात. दृढ संकल्प, कठोर मेहनत आणि योग्य दिशा असेल तर मनुष्य आयुष्यात वेगळ्या उंचीवर पोहोचू शकतो, हे सिंघानिया यांच्या कहाणीतून शिकण्यासारखे आहे.