नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गुजरात दौऱ्यानंतर, काँग्रेससाठी गुजरातमध्ये हळूहळू अनुकूल वातावरण तयार होत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधले ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांनी दिल्लीत संध्याकाळी राहुल गांधी यांची भेट घेतली. 


काँग्रेससाठी हळूहळू अनुकूल वातावरण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी 23 ऑक्टोबरला गुजरातमध्ये आयोजित रॅलीत राहुल गांधी येणार असल्याचं अल्पेश ठाकोर यांनी सांगितलं. तसंच आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचंही ते म्हणाले. 


निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देण्याचं आवाहन


विशेष म्हणजे गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देण्याचं आवाहन, काँग्रेसनं पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनाही केलं होतं. मात्र हार्दिक पटेल यांनी 20 टक्के आरक्षणसंबंधी आश्वासनाचा मुद्दा पुढे करत, आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवणं पसंत केलं.