नवी दिल्ली : एकदा का आग लागली की, ती विझवने कठीण बनते. भाजपने देशात हिंसा आणि आग लावण्याचे काम करत आहेत. ही आग विझवण्याचे कार्य एकच शक्ती करू शकते. ही शक्ती आहे कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते. आमचे विरोधक भाजपवाले देशात हिंसा आणि जातीयतेचे राजकारण पसरवत आहेत. ते भारत तोडू पाहतायत. पण, कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते देश जोडतील, असा विश्वास कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला.


कॉंग्रेसचा आवाज आवाज संपूर्ण देशातून ऐकू येईल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी यांनी पक्षाच्या मुख्यालयात अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी पक्षकार्यकर्त्यांना संबोधिक करताना ते बोलत होते. या वेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, प्रेम, आणि शांततेच्या मार्गाने देशाला उंचीवर नेऊन ठेवतील. मी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वास देतो की, येत्या काळात आपला आवाज संपूर्ण देशातून ऐकू येताना दिसेल, असा कॉंग्रेस कार्यकर्त्यांना विश्वास देत कॉंग्रेसचे नवनिर्वाचीत अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले....



क्रोधाचे राजकारण प्रेमाने जिंकू


पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, आपण एका कुटुंबातले आहोत. मी युवकांना सांगू इच्छितो की, आपण प्रेमाचा, बंधुभावाचा हिंदूस्थान निर्माण करू. आक्रमक आणि क्रोधाने भरलेल्या राजकारणासोबत आपली लढाई आहे. पण ही लढाई आपण प्रेमाच्या बळावर जिंकू. मला माहित आहे माझा कार्यकर्ता कठोर मेहनत आणि घाम गाळून कॉंग्रेसची विचारधारा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतो. या कार्यकर्त्याचा विश्वास सांभाळने ही माझ्यावरची मोठी जबाबदारी आहे. आपला आवाज संपूर्ण देशात पोहोचेल आणि लोकही तो ऐकतील. भाजपजवळ जगातील सर्वात जूनाट विचार आहे. ते कॉंग्रेसमुक्त भारत निर्माण करू पाहतात. भाजपवाले स्वत:साठी लढत आहेत. आपण (कॉंग्रेस) नवा भारत निर्माण करू.



राहुल गांधींच पंतप्रधानांवर घणाघात


राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे की, मी आदर्श्वादी आहे. मी 13 वर्षांपूर्वी राजकारणात पाऊल ठेवले. या काही वर्षांमध्ये मी देशाचा दौरा केला. भारत समझून घेतला. मला वाटत होते की राजकारण हे लोकांची सेवा करण्यासाठी आहे. मात्र, आजचे राजकारण बदलले आहे. आज लोकांना दबावात ठेवण्यासाठी राजकारण केले जात आहे. पंतप्रधान देशाला मागे घेऊन चालले आहेत, असाही घणाघात राहुल यांनी आपल्या भाषणात केला.