नवी दिल्ली : राहुल गांधी काही दिवसांसाठी देशाच्या बाहेर जात आहेत. आपली आई आणि यूपीएच्या चेअरपर्सन सोनिया गांधी यांच्यावरी उपचारासाठी ते जात असल्याचे बोलले जात आहे. दरवर्षी सोनिया गांधी यांचे रुटीन चेकअप होत असते. यासंदर्भातील माहिती नुकतीच त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली. यासोबतच भाजपावर निशाणा साधण्याची संधीही त्यांनी सोडली नाही. 'सोनियाजींच्या रुटीन चेकअपसाठी काही दिवस देशाबाहेर असेन, त्यामुळे भाजपा सोशल मीडिच्या ट्रोल आर्मीच्या मित्रांना जास्त काम करण्याची गरज नसेल, लवकरच परत येईन.' असा टोला त्यांनी लगावला आहे. 


लवकरच परत येतोय 



सोनिया गांधी दरवर्षी चेकअपसाठी विदेश जात असतात. यावेळी राहुल गांधीदेखील त्यांच्यासोबत जात आहेत. २०११ साली अमेरिकेत सोनिया यांची सर्जरी झाली होती. देशातील निवडणुकींचे वातावरण पाहता राहुल गांधी एका आठवड्यात देशात परततील पण सोनिया गांधी या काही काळ विदेशात राहतील अशी माहिती सुत्रांतर्फे देण्यात येत आहे. राहुल यांच्या विदेश दौऱ्यावर भाजपातर्फे नेहमी निशाणा साधला जातो. राहुल हे याआधी जेव्हा जेव्हा विदेश दौऱ्यावर गेले तेव्हा भाजपाने कॉंग्रेसवर हल्लाबोल केला होता. हा सर्व अनुभव पाहता राहुल गांधी पूर्ण तयारीने विदेशात जात आहेत, जेणेकरुन भाजपाला विरोध करण्याची कोणती संधी मिळू नये.