राहुल गांधींनी घेतली पवारांची भेट
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली.
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली.
२०१९ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राहुल गांधींनी ही भेट घेतल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
भाजपविरोधी मोट बांधण्यासाठी राहुल गांधी सध्या रणनिती आखत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या ६ जनपथ निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास ४० मिनिटं चर्चा झाली.