Assembly Elections : `आम्ही वचन पूर्ण करू...`, तीन राज्यातील पराभवानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात...
Assembly Elections Results 2023 : तेलंगणा पोलिसांनी रविवारी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ए. रेवंत रेड्डी यांनी 4 किंवा 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी सुरक्षा व्यवस्था करण्यास सांगितले आहे.
Assembly Elections Results 2023 : विधानसभा निवडणूक (Assembly Elections) झालेल्या पाचपैकी तीन राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत भाजपने (BJP) मिळवलं आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसला परंपरा मोडून काढता आली नाही. भाजपने 164 जागेवर शिक्कामोर्तब करत झेंडा रोवला आहे. तर मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि छत्तीसगढमध्ये (Chhattisgarh) देखील भाजपने विजय मिळवत काँग्रेसला धूळ चारली आहे. मात्र, काँग्रेसला पहिल्यांदाच तेलंगाणामध्ये (Telangana) सरकार स्थापन करण्यात यश आलंय. तीन राज्यात झालेल्या पराभवानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले Rahul Gandhi ?
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो. विचारधारेची लढाई सुरूच राहील. मी तेलंगणातील जनतेचा खूप आभारी आहे. प्रजालू तेलंगणा बनवण्याचे वचन आम्ही नक्कीच पूर्ण करू. सर्व कार्यकर्त्यांचे त्यांच्या परिश्रम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार, अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केली आहे.
दरम्यान, तेलंगणा पोलिसांनी रविवारी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ए. रेवंत रेड्डी यांनी 4 किंवा 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी सुरक्षा व्यवस्था करण्यास सांगितले आहे. काँग्रेस पक्ष 60 जागांचा साधा बहुमताचा आकडाही सहज पार करताना दिसत आहे. रेड्डी यांनी रविवारी राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) अंजनी कुमार यांना शपथविधी सोहळ्यासाठी सुरक्षा व्यवस्था करण्यास सांगितले.