नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरून पाकिस्तानला लक्ष्य करत सरकारच्या भूमिकेचं समर्थन केलंय. काश्मीर हे भारताचं अंतर्गत प्रकरण असून पाकिस्तानला त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधींनी ट्विटच्या माध्यमातून पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं की, 'काश्मीर भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. पाकिस्तान आणि इतर कोणत्याही देशाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची गरज नाही.'



पाकिस्तानच्या एका गोष्टीमुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. पाकिस्तानने काश्मीर प्रकरणात संयुक्त राष्ट्रामध्ये दिलेल्या प्रस्तावात राहुल गांधी यांच्या एका वक्तव्याचा वापर केला आहे. काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरेजवाला यांनी म्हटलं की, पाकिस्तानने राहुल गांधी यांच्या नावाचा चुकीचा वापर केला आहे.