मुंबई : मुंबई दहशतवादी हल्ल्यांचा मास्टर माईंड हाफीज सईद याच्या सुटकेनंतर भारतातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही हाफीज सईदच्या सुटकेच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा लावला.


नरेंद्र भाई बात नही बनी, दहशतवादाचा मास्टरमाईंड निर्धास्त फिरतोय. गळाभेट कामी आली नाही आणि जास्त गळाभेटींची गरज आहे, असं राहुल गांधी यांनी सोशल वेबसाईट ट्विटरवर म्हटलंय. 

यापूर्वी, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तान सेनेनं लष्कर फंडिंगमध्ये क्लीनचीट दिलीय. मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकन काँग्रेसनं एक विधेयक संमत केलंय ज्यात पाकिस्तानला अमेरिकन सुरक्षा दल आणि अफगानिस्तान सेनेसोबत हक्कानी नेटवर्कविरुद्ध काम करावं लागणार आहे. अमेरिकन काँग्रेसनं या विधेयकात लष्कर ए तोयबाचं नाव हटवलंय.