२०१९ची लोकसभा जिंकलो तर आपण पंतप्रधान - राहुल गांधी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुढचा पंतप्रधान काँग्रेसचा असेल, असा दावा केलाय.
बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुढचा पंतप्रधान काँग्रेसचा असेल, असा दावा केलाय. दरम्यान, २०१९ची लोकसभा निवडणूक काँग्रेसने बहुमतांने जिंकली तर पुढचा पंतप्रधान काँग्रेसचा असेल असे राहुल यांनी म्हटलेय. राहुल गांधी यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. काँग्रेसचा पुढील पंतप्रधान असेल का, आपण पंतप्रधान पदाचे दावेदार असाल का? होय, का नाही?, हे सांगताना आपल्या पक्षाला बहुमत मिळणे आवश्यक आहे, असे राहुल यांनी स्पष्ट केले.
आम्ही वारंवार पंतप्रधानांना विचारत आहोत की त्यांनी भ्रष्ट व्यक्तीची निवड का केली आहे, जो आपल्या पक्षाचे मुख्यमंत्री म्हणून जेलमध्ये गेला आहे ? दरम्यान, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना विचारले असता की जर ते काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असेल तर २०१९ मध्ये पंतप्रधान होण्याची शक्यता आहे का? त्यावर राहुल गांधी म्हणालेत, होय. का नाही?
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भाजप अध्यक्ष अमित शाह हे खूनातील आरोपी आहेत, असे म्हटलेय. त्यामुळे भाजपकडून आता काय प्रतिक्रिया येते याकडे लक्ष लागले आहे.