मेघालय विधानसभा निडणूक २०१८: काँग्रेसच्या प्रचाराची राहुल गांधीकडून रॉकींग सुरूवात
युवकांना आकर्षित करण्यासाठी राहुल गांधी एका `रॉक शो`मध्ये सहभागी होणार आहेत.
शलाँग : मेघालयच्या युवकाचे पाश्चात्य संगीतावर असलेले प्रेम ध्यानात घेऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणूक प्रचाराची सुरूवात एकदम रॉकींग करायचे ठरवले आहे. युवकांना आकर्षित करण्यासाठी राहुल गांधी एका 'रॉक शो'मध्ये सहभागी होणार आहेत.
राहुल गांधींनी काहीशी वापरली हटके पद्धत
मेगालयच्या युवकांना आकर्षीत करण्यासाठी राहुल गांधींनी काहीशी हटके पद्धत वापरली आहे. मेघालय विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुरूवात करण्यासाठी त्यांनी चक्क 'रॉक शो'मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या शोची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे नेतृ्त्व जोरदार प्रयत्न करत आहे. या शोला प्रवेश मोफत असल्याचेही काँग्रेसने स्पष्ट केले आहे.
काँग्रेसने प्रचारासाठी वेगळी आणि महत्त्वपूर्ण वाट
रॉक शोमध्ये संगीत, संकृती, परंपरा आणि युवकांवर प्रकाश टाकला जाणार आहे. याच कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रपती महात्मा गांधी यांनाही श्रद्धांजली आर्पण केली जाणार आहे. मेघालयचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष विसेंट पाला यांनी म्हटले आहे की, राज्याच्या युवकांना संपर्कात आणण्यासाठीच केवळ संगिताचा वापर केला जाणार नाही. तर, काँग्रेसने प्रचारासाठी वेगळी आणि महत्त्वपूर्ण वाट स्विकारली आहे.
२७ फेब्रुवारीला विधानसभेच्या निवडणुका होतील
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मेघालयमध्ये ८६००० युवक मतदाता आहेत. राहुल गांधी ३१ जानेवारीला मेघालयमधील प्रमुख धार्मिक स्थळांना भेटी देतील तसेच, धार्मिक लोकांसोबतही चर्चा करतील. मेघायलमध्ये २७ फेब्रुवारीला विधानसभेच्या निवडणुका होतील. तर, तीन मार्चला निवडणुका घोषीत होणार आहेत.