नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्यावर निशाणा साधलाय. पाकिस्तान अधिकृत बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी ठिकाणांवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर बोलताना, सर्जिकल स्ट्राईक पंतप्रधान मोदींनी नाही तर भारताय सेनेनं यशस्वी केली... आणि भारतीय सेना ही पंतप्रधान मोदींची खाजगी संपत्ती नाही, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री मोदींवर निशाणा साधला. यूपीए सरकारच्या काळात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सना व्हिडिओ गेम म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सेनेचा अपमान केल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय. 


आम्ही कधीही आपल्या सशस्र दलाचं राजकारण केलं नाही. सेना देशाची असते ती एका व्यक्तीची नसते, असंही राहुल गांधींनी म्हटलंय. 



दहशतवादाशी कठोरपणेच दोन हात करायला हवेत... मोदी सरकारपेक्षा जास्त कठोरपणे आम्ही दहशतवादाशी दोन हात करू, असं आश्वासनही राहुल गांधींनी यावेळी दिलं.