Rahul Gandhi : लग्न कधी करणार? रायबरेलीत जनतेचा प्रश्न; प्रियांकांनी घेरल्यावर `दादूस` राहुलने दिलं दिलखुलास उत्तर
Rahul Gandhi On marriage plan : राहुल गांधी लग्न कधी करणार? असा प्रश्न समोर आल्यावर रॉलीदरम्यान प्रियांका गांधी-वाड्रा (Priyanka Gandhi) यांनी भावाला कसं घेरलं? याचा व्हिडीओ समोर आलाय.
Priyanka Gandhi pulling Rahul Gandhi in Rae Bareli : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. चौथ्या टप्प्याचा प्रचार आज पार पडला. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीची चुरस आणखीच वाढली आहे. अशातच आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) पूर्ण ताकदीनिशी प्रचार करताना दिसत आहेत. अशातच राहुल गांधी यांनी रायबरेलीमध्ये (Rae Bareli) शक्तीप्रदर्शन केलं अन् विरोधकांवर टीका केली. त्यावेळी त्याच्यासोबत प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) देखील उपस्थित होत्या. सभा संपल्यानंतर एका तरुणाने राहुल गांधी यांना जेव्हा लग्नाविषयी प्रश्न केला, तेव्हा त्यांनी दिलखुलास उत्तर दिलं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्रियंका गांधी गेल्या अनेक दिवसांपासून भाऊ राहुलचा प्रचार करत आहेत. सोमवारी राहुल गांधींनी महाराजगंज शहरातील जत्रेच्या मैदानावर जाहीर सभेला संबोधित केलं. राहुल गांधी यांनी यावेळी धमाकेदार भाषण केलं. राहुल गांधी यांचं भाषण संपल्यानंतर राहुल आणि प्रियंका दोघंही स्टेजवरून जात असताना तरुणाने राहुल गांधी यांना लग्नाविषयी प्रश्न विचारला. राहुल भैय्या लग्न कधी करणार? असा प्रश्न त्यांनी विचारला तेव्हा प्रियांका गांधी यांना दादुस राहुल यांना घेरण्याची आयती संधी मिळाली.
प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी यांना थांबवलं अन् प्रश्नाचं उत्तर आधी दे, असं सांगितलं. त्यावेळी राहुल गांधी यांनी देखील गुगली फेकली. लवकरच लग्न करावं लागेल, असं राहुल गांधी यांनी यावेळी म्हटलं. यावेळी संपूर्ण सभेत एकच हास्यकल्लोळ झाला. त्याचा व्हिडीओ देखील आता समोर आला आहे.
पाहा Video
दरम्यान, रायबरेलीशी आमच्या कुटुंबाचे नाते 100 वर्षे जुने आहे. इतिहासातील ही पहिलीच निवडणूक आहे ज्यात काँग्रेस संविधानाच्या रक्षणासाठी लढत आहे. मला दोन आई आहेत. एक म्हणजे सोनिया गांधी आणि दुसरी इंदिरा गांधी ज्यांनी मला संरक्षण दिलं. रायबरेली हे माझ्या दोन्ही आईचं कार्यस्थळ आहे. त्यामुळेच मी येथून निवडणूक लढवण्यासाठी आलो आहे, असं राहुल गांधी यांनी यावेळी म्हटलं आहे.