नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे माजी सहकारी राहिलेले सुधींद्र कुलकर्णी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच देशाचे भविष्यातील पंतप्रधान असतील असे मत व्यक्त केले आहे. देशाला राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे, असे सांगात कुलकर्णी यांना राहुल गांधी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


गांधीवादी राजकीय विचार मानणारा व्यक्ती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा देताना कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, मला विश्वास आहे की, राहुल गांधी हे देशाचे पुढेच पंतप्रधान होतील. आणि त्यांनी व्हायलाच हवे. एका नव्या नेत्याचा उदय झाला आहे. भारताला अशा नेतृत्वाची गरज आहे. अशा शब्दांत राहुल गांधींचे कौतूक आणि शुभेच्छा देतानाच कुलकर्णी यांनी राहुल गांधी हे गांधीवादी राजकीय विचार मानणारा व्यक्ती असेही म्हटले आहे.


सोनिया गांधी धाडसी


सुधींद्र कुलकर्णी यांनी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचेही कौतूक केले आहे. सोनिया गांधी या धाडसी महिला आहेत. त्यांनी 19 वर्षे कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाढली. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षीय भाषणाचेही कौतूक करताना कुलकर्णी यांनी म्हटले की, सोनिया यांचे भाषण लाखो लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचले. त्यांनी आपल्या भाषणात भारताची महान संस्कृती, लोकशाहीचे कौतूक केले. ज्यामुळे त्यांना भारतीयांनी आपलेसे केले होते, असेही कुलकर्णी यांनी म्हटले आहे.


राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे अधिकृतरित्या शनिवारी स्विकारली. या वेळी सोनिया गांधी, माजी पंतप्रदान मनमोहन सिंह, मोतीलाल व्होरा, यांच्यासह कॉंग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.